पाटणा
बिहारच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या संजद नेते उपेंद्र कुशवाह यांनी पुन्हा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केले आहे. संयुक्त जनता दल हा नितीश कुमार यांच्या मालकीचा पक्ष नाही. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. याचमुळे आम्ही पक्षाची बैठक बोलाविली आहे. तथाकथित पक्षनेतृत्व कारवाई करण्याची धमकी देत असले तरीही आम्ही घाबरणार नसल्याचे कुशवाह यांनी म्हटले आहे. कुशवाह यांनी संजदमध्ये राहूनच नितीश कुमार यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे.









