सतीश अण्णा ऑल इंडिया जलद बुद्धिबळ स्पर्धा : विविध गटात वरद, शौर्य, आदित्य, अस्मिता, श्रीकारा, गिरीश, किरण यांना यश
बेळगाव : बेळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व सतीश अण्णा फॅन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सतीश अण्णा ऑल इंडिया जलद बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात गोव्याच्या नितीश बेलूरकरने विजेतेपद पटकावित लाखाचे बक्षीस पटकाविले. तर विविध गटात अस्मिता राय, श्रीकारा दबी, गिरीश बाचीकर, वरद पाटील, शौर्य बगादीया, आदित्य चव्हाण, किरण पंडितराव, शर्वरी काबनुरकर यांनी विजेतेपद पटकाविले. महावीर भवन येथे आयोजित ऑल इंडिया जलद बुद्धिबळ स्पर्धेत खुल्या गटात गोव्याच्या नितीश बेलूरकरने 8.5 गुणासह विजेतेपद पटकावित 1 लाखाचे बक्षीस मिळविले. चेन्नईच्या शैलेश आर. ने 8 गुणासह दुसरा क्रमांक पटकाविला. रितवेज परबने (गोवा) 7.5 गुणासह तिसरा क्रमांक, मंगळूरच्या एम. जे. गहानने 7.5 गुणासह चौथा, चन्नईच्या शाम आर. ने 7.5 गुणासह पाचवा, आयसीएफच्या लक्ष्मण आर. आर. ने 7.5 गुणासह सहावा क्रमांक, कोल्हापूरच्या समेद जयकुमार शेठने सातवा, हैद्राबादच्या कार्तिक साईने आठवा, गोव्याच्या मंदार लाडने नववा, ठाण्याच्या महम्मद लुबीरशहा शेखने दहावा क्रमांक पटकाविला. म्हैसूरच्या बाळकृष्ण ए. ने अकरावा, मिरजच्या मुद्दसर पटेलने बारावा, चन्नईच्या रामनाथन बालसुब्रह्मण्यमने तेरावा, कोल्हापूरच्या अनिश गांधीने चौदावा, रेंदाळच्या शिराज भोसलेने पंधरावा, हुबळीच्या आदीत्य कल्यानीने सोळावा, बेंगळूरच्या सुदर्शन भटने सतरावा, गोव्याच्या ऋषिकेश परबने अठरावा, मुंबईच्या दिलीप गोलवणकरने एकोणिसावा, हावडाच्या इशान दासोत्तारने विसावा क्रमांक पटकाविला. 14 वर्षाखालील गटात गोव्याची अस्मिता राय प्रथम, बेळगावचा साई मंगनाईक दुसरा, गोव्याचा मयुरेश देसाई तिसरा, गडहिंग्लजचा स्वरूप साळवी चौथा, बेळगावचा गगन मुतगी पाचवा क्रमांक पटकाविला.
16 वर्षाखालील गटात बेळगावच्या श्रीकारा दबीने प्रथम, कोल्हापूरच्या शांतनु पाटीलने दुसरा, बेळगावच्या साईप्रसाद कोकाटेने तिसरा, गोव्याच्या सौरव पेडणेकरने चौथा, कोल्हापूरच्या ऋशिकेश काबुनरकरने पाचवा क्रमांक पटकाविला. बेळगाव मर्यादीत : गिरीश बाचीकर 7 गुणांसह प्रथम, दासारी दत्तात्रयराव 7 गुणासह दुसरा तर अभिषेक गाणगेरने 6 गुणासह तिसरा क्रमांक पटकाविला. 8 वर्षाखालील गटात सांगलीच्या वरद पाटीलने प्रथम, बेळगावच्या अथर्व मुंगुरवाडीने दुसरा, हुबळीच्या विराज कट्टीमनीने तिसरा, बेळगावच्या दिव्यांशु तालिनमनीने चौथा, गोव्याचा श्रीशित गोणसेकरने पाचवा. 10 वर्षाखालील गटात इचलकरंजीचा सौरव बगादीया प्रथम, सांगलीचा आशिष मोती दुसरा, बेळगावचा वेदांत ताबाज तिसरा, कापसीचा प्रेम गंगाराम चौथा तर सांगलीचा मंथन शहानेने पाचवा क्रमांक पटकाविला. 12 वर्षाखालील गटात सांगलीच्या आदित्य चव्हाणने प्रथम क्रमांक, जयसिंगपूरच्या अभय भोसले दुसरा, बेळगावचा अनिरूध्द दासारी तिसरा, कोल्हापूरचा अंशुमन शेवडे चौथा, कोल्हापूरचा रिनाथ मोदीने पाचवा क्रमांक पटकाविला. उत्कृष्ट वेटरन्स पुरूष गटात किरण पंडितराव पहिला, रामचंद्र भट दुसरा तर महिला गटात शर्वरी काबनुरकर पहिला, तृप्ती प्रभुने दुसरा क्रमांक पटकाविला. उत्कृष्ट अकादमीचा पुरस्कार गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ संघटना प्रथम तर आकाश बुद्धिबळ संघटनेने दुसरा क्रमांक पटकाविला. स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे, पुरस्कृर्ते रिहान मुजावर, इम्रान मुजावर, बुद्धिबळ प्रशिक्षक प्रशांत अणवेकर, बीडीसीएचए अध्यक्ष निलेश भंडारकर, दत्तात्रयराव, प्रमुख पंच भरत चौगुले, दिपक वाच्याल, किरण परीट आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बीडीसीएसच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









