वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सौदी अरेबियात बुधवारी आयोजित केलेल्या सहाव्या आशियाई 18 वर्षांखालील वयोगटाच्या अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा धावपटू नितीन गुप्ताने पुरुषांच्या 5000 मी. चालण्याच्या शर्यतीत रौप्य पदक पटकाविले.
पुरुषांच्या 5000 मी. चालण्याच्या शर्यतीत चीनच्या झू निंगहेओने 20 मिनिटे 21.50 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण पदक मिळविले तर भारताच्या नितीन गुप्ताने 20 मिनिटे 21.51 सेकंदाचा अवधी घेत रौप्य तर चीन तैपेईच्या शेंग लो याने 21 मिनिटे 37.88 सेकंदाचा अवधी घेत कांस्य पदक घेतले. गेल्या महिन्यात 17 वर्षीय नितीन गुप्ताने पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय युवा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 5000 मी. चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. सौदी अरेबियातील या स्पर्धेत थाळीफेक, लांबउडी, 100 मी. आणि 400 मी. धावणे या क्रीडा प्रकारात भारताचे स्पर्धक सहभागी होत आहेत.









