Nitin Gadkari : सांगली शहराला पुणे बंगळूर महामार्गाला जोडणारा पेठ-सांगली रस्ता हा गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. या रस्त्यावर असणारे खड्डे आणि रस्त्याचे झालेलं अर्धवट काम यामुळे वाहनधारक तसेच नागरिकांमधून सरकार विरोधात नेहमीच रोष व्यक्त करण्यात येत होता. हा रस्ता केंद्राच्या माध्यमातून करण्यासाठी खासदार, आमदार यांनी पाठपुरावा केला होता. अखेर केंद्रीय राष्ट्रीय रस्ते विभागाच्या माध्यमातून हा रस्ता सांगली पेठ चौपदरीकरण रस्ता करण्यात येत आहे. आज या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गडकरी यांनी ठेकेदाराला दम दिला.रस्त्याच्या कामात जर गडबड कराल, तर थेट बुलडोजर घालू,असा दम दिला.
नितीन गडकरी म्हणाले की, या कामाला एक महिन्यात सुरुवात होईल त्यानंतर पुढील 25 वर्ष या रस्त्यात एकही खड्डा पडणार नाही, अशा पद्धतीचे काम केलं जाईल. मी रस्त्याच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची टक्केवारी घेत नाही, या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी गडबड करता कामा नाही. अन्यथा ठेकेदाराला बुलडोझर खाली टाकू अशा शब्दात नितीन गडकरींनी दम भरला.पुढे बोलताना ते म्हणाले की, या रस्त्यासाठी सुपीक जमीन संपादित करण्यात येणार होती. त्यामुळे काहीसा विलंब झाला. मात्र, आता रस्त्याचे काम सुरु होत आहे. या रस्त्यासाठी 860 कोटींचा खर्च होणार आहे. कंत्राट मिळालं आहे. मी ठेकेदारांना नेहमीच सांगतो, मी तुमच्याकडून माल (टक्केवारी) खात नाही. देशात एक ठेकेदार नाही असा ज्याच्याकडून मी एक रुपया घेतला आहे. त्यामुळे कामात गडबड केल्यास बुलडोझरखाली टाकेन असेही ते म्हणाले.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








