Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या जयेश पुजारी प्रकरणात आता अनेक नवनवीन गौप्यस्फोट समोर आले आहेत. याबाबत एऩआयकडे अहवाल सुपूर्द केला आहे.त्याचबरोबर नागपूर पोलिसांनी आय़बीला देखील दिला अहवाल दिला आहे. ज्यामध्ये कर्नाटकमधील बड्या नेत्याच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नागपूर पोलीसांनी जयेश पुजारीची चौकशी सुरु केल्यानंतर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. जयेश पुजारीचे पीएफआय, लष्करी तोयब्बा, दाऊद यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले होते. दरम्यान काल रात्री आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे ज्यात कर्नाटकातील मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे त्याने कबुल केले आहे. तसेच ही हत्या निवडणुकीच्या दरम्यान करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. काही दिवसापूर्वी बेळगाव तुरुंगातून सुटका झालेल्या आरोपीला या खूनासाठी हत्याराची व्यवस्था तुरुंगातून केल्याचीही माहिती समोर आली आहे. हि माहिती समोर आल्यानंतर नागपूर पोलीसांनी कर्नाटक पोलीसांना याबद्दल सूचना दिल्या आहेत.
जयेश पुजारी याने नितीन गडकरी यांच्याकडून खंडणी उखळण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे कर्नाटकातील मोठ्या नेत्यांच्या हत्य़ेचा कट रचण्यात आला होता. यामध्ये जयेश पुजारीची प्रमुख भुमिका होती.
Previous Articleमानकुराद आंबे खाताय, सावधान !
Next Article कोलवाळ, म्हापशात कॉम्बिंग ऑपरेशन








