सावंतवाडी । प्रतिनिधी
दिनांक २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०२४ रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोकण प्रांताचे ५९ वे कोकण प्रांत अधिवेशन सावंतवाडी येथील भोसले नॉलेज सिटी येथे आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने अधिवेशन कार्यालय सावंतवाडी येथे आमदार नितेश राणे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी अधिवेशनाची माहिती घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली व पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.मनिष दळवी, अधिवेशन स्वागत समिती सचिव अतुल काळसेकर, व्यवस्था सहप्रमुख डॉ. राजशेखर कार्लेकर, शहरमंत्री स्नेहा धोटे, व्यवस्था प्रमुख चिन्मयी प्रभू खानोलकर, अवधूत देवधर, तुषार पाबळे, विनीत परब, सौरभ दांडगे, सिद्धेश म्हापसेकर,दिग्विजय पाटील, जयवंत पवार, गौरी वारंग आदी उपस्थित होते.
Previous Articleपर्राकरांनी बहुजनातील युवकांना घडविले राजकारणी!
Next Article दापोली आगार हिरकणी कक्ष कुलूपबंद









