Nitesh Rane on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत गृहकलह निर्माण करणारे आहेत. ठाकरे कुंटुंबात वाद निर्माण करतच आहेत. शिवाय पवार कुटुंबात राऊंतामुळे दुफळी पडतेय अस वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. संजय राऊतांच्या वडिलांचे नाव राजाराम आहे. हे कोणाला माहित आहे? राऊत कुठल्या बापाचं नाव लावतात? दुसऱ्याच्या वडिलांविषयी बोलता तुमच्या वडिलांविषयी जरा महाराष्ट्राला सांगा. बाळासाहेब ठाकरे यांच्या घरात आग लावणारा कोणी असेल तर ते संजय राऊत आहेत. त्यांनी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन भावात वाद निर्माण केला असा आरोप नितेश राणे यांनी केला.
यावेळी बोलताना राणे म्हणाले, राऊत सगळीकडे फक्त आग लावण्याचे काम करतात. ठाकरे कुटुंबात तर लावलीच पण आता पवार कुटुंबात देखील आग लावण्याचे काम सुरु केलं आहे. एकीकडे अजितदादांच्या विरोधात बोलायचं.तर, दुसरीकडे शरद पवार साहेबांच्या बाजूने बोलायचं.म्हणजेच एकसंघ असणाऱ्या कुटुंबात फुट कशी पाडायची हा सध्या त्यांचा कार्यक्रम सुरु आहे. त्यांच्या या वागण्याने अजितदादांनी आणि शरद पवार यांनी खडसावले आहे.एवढच नाही तर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यात युवासेना प्रमुखपदावरून वाद निर्माण करायचं काम देखील राऊतांनीचं केल अशी टीका राणेंना राऊतांवर केली.
आदित्य ठाकरे यांनी काल मी संस्कारी आहे म्हणूनच राणेंच्या वक्तव्याला उत्तर देणार नाही अस वक्तव्य केलं. यासंदर्भात बोलताना राणे म्हणाले की, मुंबईतील गुंडांना बारसूत आणण्याचा यांचा डाव आहे. आदित्य ठाकरेंवर चांगले संस्कार झाले असते तर दिशा सालियान जिवंत असती.आरेच्या आंदोलनात लहान मुले बाजूला का लागतात? याचा खुलासा, पोलखोल करू का? असा सवालही यावेळी राणेंनी केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








