राजापूर / प्रतिनिधी –
Nitesh Rane On Uddhav Thackeray : आज रत्नागिरीतल्या बारसु गावात हेलिकॉप्टरने जे पर्यटक आले आहेत तेच या देशाचे सर्वात मोठे दलाल आहेत . महाराष्ट्र पेटवण्याची भाषा करताय आधी लोकांच्या घरातील चुली पेटवा.स्वतःची चुल पेटवण्यासाठी मुंबईत गुजराती मारवाडी लोकांना ठेके देणारे कोकणचे भले काय करणार असा सवाल करत आमदार नितेश राणे यांनी उध्दव ठाकरेंवर टिका केली आहे .कोकणचा विकास करण्यासाठी कोकणवासीयांना हा प्रकल्प हवा आहे तो रद्द करण्याची हिम्मत कुणाच्यात नाही असा घणाघात राणे यांनी राजापूर जवाहर चौक येथील समर्थन मोर्च्यावेळी केला.उध्दव ठाकरे यांच्या पत्रामुळेच बारसूत प्रकल्प आला.मात्र आता ते विरोध करत आहेत.ठाकरे फक्त धन की बात समजतात.उध्दव ठाकरे कोकणाला लागलेला शाप आहेत अशा शब्दात निशाणा साधला.
यावेळी बोलताना राणे म्हणाले की,या प्रकल्पातून उध्दव ठाकरेंना खोके हवे आहेत आणि हा विरोध केवळ खोक्यांसाठीच आहे असेही राणे म्हणाले.उध्दव ठाकरेकडे पेटवायला माचिस पण नाही त्यांच्याकडे फक्त आमदार राजन साळवी आहेत जो कधीच कुणाचा झाला नाही. याच राजन साळवीला मी तिन वेळा निवडणूकीला उभा असताना पैसे दिले आहेत असा आरोपही केला. प्रकल्प हवा असेल तर घराबाहेर पडा आज जर तुम्ही घराबाहेर पडला नाहीत तर तुमची भविष्यातली पिढी तुम्हाला शिव्या घालेल हा प्रकल्प आपल्याला भविष्यासाठी हवा आहे असेही ते म्हणाले.
ज्यावेळी बारसुची जागा उध्दव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पासाठी सुचवली त्यावेळी त्याप्रकल्पावरुन पुढे घडणाऱ्या घटनांचा विचार केला होता का ?आणि आजच त्या लोकांची तुम्हाला कशी आठवण आली असा खोचक सवालही यावेळी राणेंनी केला. उध्दव ठाकरेंना कोकणशी काहीही देणे घेणे नाही ते येतील आणि माथी भडकावतील हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. मात्र आम्हाला येथील जनतेची माथी शांत ठेवायची आहेत त्यासाठी आम्ही या प्रकल्पाच्या समर्थनार्थ आलो आहोत.प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे ते सर्वाना दिसावे त्यासाठी ही आजची सुरुवात आहे. भविष्यात या प्रकल्पाच्या समर्थनासाठी मोठी सभा आयोजित करुन हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही निलेश राणे यानी दिली आहे .जवाहर चौकातील सभा संपल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन प्रकल्प समर्थनाचे निवेदन प्रशासनाला देण्यासाठी राजापूर तहसिल कार्यालयाच्या दिशेने समर्थकांचा मोर्चा मार्गस्थ झाला .
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








