कणकवली /प्रतिनिधी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांच्या मदतीसाठीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करून तत्परता दाखवणारे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांचा भाजप प्रवक्ते, आमदार नितेश राणे यांनी सत्कार केला. मंगेश चिवटे हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना येथील प्रहार भवन येथे आमदार राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री राणे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून जिल्ह्यातील जनतेला केल्या जात असलेल्या मदतीबद्दल राज्य सरकारचे आभार ही व्यक्त केले.मुख्यमंत्री सहायता निधीमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांचे प्रस्ताव जेव्हा मुंबई मंत्रालयात जातात तेव्हा राज्य सरकारकडून अशा रुग्णांना तातडीची आर्थिक मदत केली जाते. या सर्व प्रक्रियेत मंगेश चिवटे हे नेहमीच सहकार्याच्या भावनेतून या रुग्णांना न्याय देतात. त्याबद्दलही आमदार नितेश राणे यांनी आभार व्यक्त करत सत्कार केला.
Previous Articleसातुळी सातेरीचा आज वार्षिक जत्रोत्सव
Next Article सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सावित्रीबाई फुले जयंती









