एम. जी. हिरेमठ यांची बदली
बेळगाव : जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची बदली झाली आहे. त्या जागेवर धारवाडचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची नियुक्ती झाली असून गुरुवारी सायंकाळी नूतन जिल्हाधिकाऱयांनी पदभार स्वीकारला.
एम. जी. हिरेमठ यांची केआरआयडीएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. गुरुवारी दुपारी बदलीचा आदेश आला. त्यापाठोपाठ नूतन जिल्हाधिकारी नितेश पाटील हेही बेळगावात रुजू झाले. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, मनपा आयुक्त डॉ. रुदेश घाळी, प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सहसंचालक सी. बी. कोडली आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नितेश पाटील हे मूळचे विजापूर जिल्हय़ातील केरुटगी (ता. सिंदगी) येथील आहेत. दहावीपर्यंतचे शिक्षण विजापूर येथे पूर्ण केल्यानंतर त्यांनी बेंगळूर येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर अलाहाबाद येथील एनआयटीमध्ये बीई (कॉम्प्युटर सायन्स) पदवी घेतली. काहीकाळ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणूनही त्यांनी सेवा बजावली असून 2012 मध्ये युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले.









