किमत 8 लाखापुढे: तीन प्रकारात दाखल
वृत्तसंस्था/ मुंबई
निस्सान मोटर यांनी आपल्या मॅग्नाईट एसयुव्ही अंतर्गत कुरो या नव्या कारला बाजारात दाखल केले आहे. सदरच्या गाडीची किंमत एक्सशोरुम 8 लाख 27 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मॅग्नाइट कुरो या गाडीचे बुकिंग मागच्या महिन्यातच सुरू करण्यात आले असून 11 हजार रुपये भरून सदरची गाडी ग्राहकांना बुक करता येणार आहे. निस्सान मॅग्नाइट कुरो एसयुव्ही गटात एक्सव्ही एमटी, टर्बो एमटी आणि टर्बो एक्सव्ही सीव्हीटी या 3 हायएंड प्रकारात सादर करण्यात आली आहे. या गाडीची कोणत्याही अन्य कारशी स्पर्धा होणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
तीन प्रकारात गाडी सादर
टर्बो एक्सव्ही सीव्हीटीची किमत 10 लाख 46 हजार रुपये, टर्बो एक्सव्ही एमटीची किमत 9 लाख 65 हजार रुपये तर टर्बो एक्सव्ही सीव्हीटीची किंमत 10 लाख 46 हजार रुपये इतकी ठेवण्यात आल्याचे
कळते. कंपनीने ब्लॅक आऊट एलिमेंट रंगाचा वापर कारसाठी केला आहे. यामध्ये ग्रिल, स्किड प्लेट, बंपर, हेडलाइट अॅक्सेंट, डोअर हँडल व रुफ रेल्स हे सर्व काळ्या रंगाच्या थीमवर आधारीत आहे.









