नवी दिल्ली
बहुप्रतिक्षीत निस्सान मॅग्नाइट गेझा नव्या खास आवृत्तीतील कारचे लवकरच बाजारात लवकरच आगमन होणार आहे. यासंबंधीची घोषणा कंपनीने केली असून अनेकविध वैशिष्ट्यांचा यात समावेश असणार असल्याचे समजते.
9 इंचाची टचस्क्रीन, अँड्रॉइड कार प्ले (वायरलेस कनेक्टिव्हीटीसह) ही वैशिष्ट्यो महत्त्वाची आहेत. जपानमधील नाट्या व संगीताच्या प्रेरणेतून सदरची नवी एसयुव्ही कार तयार केली असून कार खरेदीकरिता बुकिंगला सुरूवा झाली आहे. या कारची सविस्तर माहिती 26 मे रोजी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे. बाजारात कधी सादर करणार याची माहिती देण्यात आलेली नाही.
महत्त्वाचे म्हणजे ऑडियोसाठी जेबीएलचे स्पीकर यात असणार असून ट्रॅजेक्टरी रियर कॅमेरा, अॅम्बीयंट लाइटिंगची सुविधाही असेल. देखभाल खर्च कमी तर येतोच शिवाय सुरक्षिततेचे सर्व निकष ही कार पूर्ण करते, असा दावा कंपनीने केला आहे.









