वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या 2025 च्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत शनिवारी भारताचा निशाद कुमार याने टी-47 गटातील पुरूषांच्या उंचउडी प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले.
निशादने 2020 आणि 2024 साली झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत या क्रीडा प्रकारात रौप्य पदके मिळविली होती. तसेच 2023 आणि 2024 च्या विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने या क्रीडा प्रकारात रौप्य पदके घेतली होती. शनिवारी झालेल्या या क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीत निशादने आतापर्यंत पाचवेळा विश्वचॅम्पियनशिप मिळविणाऱ्या रॉड्रीक टाऊनसेंडला मागे टाकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. 26 वर्षीय निशादने या क्रीडा प्रकारात 2.40 मी.चे अंतर नोंदवित अमेरिकेच्या टाऊनसेंडला मागे टाकताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. निशाद कुमारचा वाढदिवस असल्याने त्याने हा आनंद सुवर्णपदकाने साजरा केला. टाऊनसेंडने 2.03 मी.चे अंतर नोंदवित कांस्यपदक घेतले.









