Nirvade village is second at district level in Sant Gadgebaba Village Cleanliness Mission
महिला सरपंच असली की त्यांचे पतीच काम करताना दिसतात. मात्र निरवडे ग्रामपंचायत त्याला अपवाद आहे. येथील महिला सरंपचा सुहानी गावडे या ऍक्टिव्ह आहेत. त्यांनी विकासाचा पायंडा असाच पुढे सुरू ठेवावा, असे कौतुक कोकण विभागाचे उपायुक्त गिरीश भालेराव यांनी आज येथेे केले. दरम्यान निरवडेत झालेली समृध्दी लक्षात घेता हे गाव म्हणजे कोकणातील “राळेगणसिध्दी” असे म्हणता येईल. या ग्रामपंचायतीचा आदर्श अन्य ग्रामपंचातींनी घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले. निरवडे गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. त्यानंतर कोकण विभागासाठी निवड करण्यात आली होती. याबाबतचे मूल्यांकन करण्यासाठी आज विभागीय कोकण उपायुक्त यांची चार सदस्य टीम गावामध्ये दाखल झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री. भालेराव बोलत होते.
यावेळी उपविकास चंद्रशेखर जगताप, विभागीय समन्वयक पूजा साळगावकर, विभागीय आयुक्त विठ्ठल लांबोर, उपायुक्त विशाल तनपुरे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, जयराम जाधव, धर्माजी गावडे, अंगारिका गावडे, रेशमा पांढरे, प्रगती शेटकर, आनंदी पवार, माजी सरपंच प्रमोद गावडे, माजी सरपंच हरि वारंग, ग्रामविकास अधिकारी सुनिता कदम, निवृत्त ग्राम विकास अधिकारी मधुकर घाडी, गावातील ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
सावंतवाडी / प्रतिनिधी









