ओटवणे । प्रतिनिधी
ओटवणे करमळगाळूवाडी येथील रहिवाशी निर्मला रामचंद्र देवधर (८०) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी सैनिक कै रामचंद्र देवधर यांच्या त्या पत्नी, पुरोहित अभय देवधर यांच्या त्या मातोश्री तर सेवानिवृत्त वनपाल गोविंद देवधर यांच्या त्या भावजय होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.









