मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यातील धोका ओळखत दूरदृष्टीपणा दाखवित मुंबईत निर्भया सायबर लॅबचा शुभारंभ केला आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या तसेच खाजगी आणि सरकारी वेबसाईटवर धुमाकुळ घालणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या कारवाईला आळा घालण्याचे काम निर्भया सायबर लॅब करणार आहे. भविष्यातील सायबर गुन्हेगारीवर निर्भया सायबर लॅबची मात्रा चांगलीच उपयोगी पडणार हे नक्की.
देशातील सामान्य जनतेच्या कमाईवर डल्ला मारत सायबर गुन्हेगारांनी एकच धुमाकुळ घातला आहे. अहोरात्र मेहनत करत आयुष्यभर जमा केलेल्या पुंजीवर या सायबर गुन्हेगारांनी अवघ्या काही सेकंदात डल्ला मारण्यास सुऊवात केली आहे. अशावेळी गोल्डन अवर्समध्ये तक्रार आली तरंच पळविलेली रक्कम परत मिळवून देण्यास पोलिसांना यश येत आहे. अन्यथा या पुंजीला कायमस्वऊपी मुकावे लागत असल्याने सामान्य माणूस हैराण झाला आहे. यासाठी कर्तव्यदक्ष तसेच दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर तोडगा काढला आहे. मुंबईत त्यांच्या नेतृत्वाखाली निर्भया सायबर लॅबची स्थापना करण्यात आली आहे. आता सायबर गुन्हेगारीवर निर्भया सायबर लॅबची अचुक मात्रा लागू पडणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. पोलीस दल कशा प्रकारे अत्याधुनिक करता येईल याकडे ते स्वत: जातीने लक्ष घालत असतात.
देशालाच नाही तर संपूर्ण जगाला सायबर युद्धाचा धोका असल्याची जाणीव मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या टर्ममध्येच झाली होती. त्यानुसार त्यांनी ऑगस्ट 2016 साली संपूर्ण राज्यात 44 सायबर लॅब उघडल्या होत्या. या सायबर लॅबच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम त्यांनी केले होते. मात्र सायबर गुन्हेगारीला म्हणावा असा आळा घालता येत नसून, यामध्ये दिवसेंदिवस अत्याधुनिक यंत्रप्रणालीची जाणीव मुख्यमंत्र्यांना झाली होती. त्यानुसार, त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये मुंबईत गोवंडी, वरळी, डी.बी. मार्ग परिसरात निर्भया सायबर लॅबचे उद्घाटन करीत या लॅब सामान्यांच्या सेवेसाठी प्रदान केल्या.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. गेल्या तीन वर्षात 1 हजार 500 कोटींची सायबर फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 2024 साली 1 हजार 200 कोटींची फसवणूक करण्यात आली. त्यापैकी पोलिसांना केवळ 150 कोटी वाचविण्यात यश आले. तर 2023 साली 262 कोटींची फसवणूक करण्यात आली. त्यापैकी पोलिसांना केवळ 1.58 कोटी वाचविता आले. तसेच 2022 साली 32.35 कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारची फसवणूक केवळ मुंबईत असेल तर राज्य आणि देशात किती कोटीची असेल? जगात किती कोटीची असेल. यामुळे हा केवळ गुन्हा नाही तर तिसऱ्या महायुद्धाची नांदी आहे.
संपूर्ण जग यापूर्वी दोन महासंहारक अशा महायुद्धाने होरपळले आहे. यामुळे तिसरे युद्धाचे नांव जरी काढले तरी, अनेकांच्या शरीरावर शहारे येतात. मात्र जगात तिसऱ्या युद्धाला सुऊवात झाल्याचे रणशिंग यापूर्वीच फुंकले गेले आहे. हे तिसरे महायुद्ध म्हणजे सायबर युद्ध होय. मात्र या सायबर युद्धाला सडेतोड तोंड देण्यासाठी सध्या राज्य पोलिसांनी सरकारच्या मदतीने रणनिती आखण्यास सुऊवात केली आहे. गेल्या काही वर्षांत इंटरनेटद्वारे आर्थिक गैरव्यवहार, अश्लीलता आणि त्या संबंधी फसवणुकीच्या गुह्यांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. त्यातच आलेल्या एआय (आर्टिफिशीयल इंटेलिजन्स) टेक्नॉलॉजीने तर धुमाकुळ घातला आहे. हॅकर्स विविध उद्देशांसाठी सायबर गुन्हेगारीचा आधार घेत आहेत. त्यात मुख्यत्वे विविध बँकांमधील संबंधित खातेदाराची रक्कम आपल्या खात्यात वळवून घेणे, राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि गोपनीय माहिती चोरणे तसेच एखाद्याला ब्लॅकमेल करण्यासाठी माहितीचा वापर करणे अशा पद्धतीच्या गुन्हेगारी कृत्यांचा समावेश होतो.
अलीकडे सायबर गुन्हेगारीच्या घटना शहरी भागांबरोबर निमशहरी तसेच ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. अशावेळी संगणक वापरणाऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. गुन्हेगारांचा मागोवा घेण्याचे कार्य पोलीस खाते कौशल्याने करीत असते. सध्या संगणक युगानंतर नवी गुन्हेगारी जन्माला आली ती सायबर क्राइम. यामुळे सायबर क्राइमला आळा घालण्याचे मोठे आव्हान
पोलीस खात्यासमोर उभे राहिले आहे. या सायबर गुह्यांमध्ये अनेक प्रकारच्या गुह्यांचा समावेश होतो. सध्याच्या युगात क्रेडीट कार्डचा वापर वाढत असून क्रेडीट कार्डच्या मदतीने अनेक फसवणुकीचे गुन्हे घडत आहेत. या क्रेडीट कार्डचा गैरवापर केल्यास क्रेडीट कार्ड उपभोक्त्याला अतिरिक्त रक्कमेचा भुर्दंड भरावा लागतो. क्रेडीट कार्डचा गैरवापर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्किमर या यंत्राचा वापर केला जातो. या स्किमरच्या मदतीने व्रेडीट कार्डमधील सर्व महत्त्वाचा डेटा चोरी केला जातो. त्याचप्रमाणे एखाद्या कंपन्यांच्या वेबसाईटवर अधिक प्रमाणात चौकशीसाठी रिक्वेस्ट करून त्या एकाचवेळी मोठ्या प्रमाणात पाठवून त्या वेबसाईट थोड्या वेळापुरती किंवा पाहिजे तिथपर्यंत
ब्लॉक करून ठेवतात. त्यानंतर त्या वेबसाईटवरील महत्त्वाचा डेटा चोरी केला जातो. यामुळे अशी कंपनी भविष्यात दिवाळखोरीत देखील निघण्याची भीती असते. तसेच कॉम्प्युटरमध्ये अनावश्यक फाईल पाठवून त्या कॉम्प्युटरमध्ये तांत्रिकदृष्ट्या बिघाड निर्माण करण्यात येतो. या व्हायरसमध्ये ट्रोजन हॉर्न्स आणि वर्म्स हे दोन प्रकार असतात. ट्रोजन हॉर्न्स हा सर्वात व्हायरसचा घातक प्रकार आहे. हा व्हायरस फक्त संगणकाला नव्हे तर संपूर्ण नेटवर्कला हानी पोहोचवतात. तर वर्म्स हे फक्त संगणकाला हानी पोहोचवून त्यात तांत्रिक बिघाड निर्माण करतात. तर सायबर युद्धाचा आणखी एक प्रकार म्हणजे फिशिंग हा असून, यामध्ये इंटरनेटच्या साहाय्याने बँकिंग म्हणजेच ई-बँकींग करणाऱ्या युजरला त्याच्या ई-मेल अकाऊंटवर बँकेच्यावतीने दुसरा व्यक्ती खोटा मेल पाठवतो आणि त्या बँकेच्या ग्राहकाला बँकेच्या नावाने बनविलेल्या खोट्या वेबसाईटची हायपर
लिंक या मेलमध्ये असते. त्या लिंकवर युजरने क्लिक केल्यावर त्यात त्याला बँकेच्या संदर्भातील सर्व डेटा देण्याचे संकेत दिलेले असतात. ही वेबसाईट खोटी असल्याने हा इनपूट केलेला डेटा युजरचे बँकेचे अकाऊंटच्या संदर्भातील सर्व माहिती घेण्यासाठी बनविलेली असते. हा पाठविलेला ई-मेल आपण ज्याप्रमाणे मासे पकडण्यासाठी म्हणजेच फिशिंग करण्यासाठी खाद्य अडकवितो त्याचप्रमाणे हा ई-मेल आपल्याला फसवण्यासाठी पाठविला जातो.
त्याचप्रमाणे, चीन, कंबोडिया नायजेरीयन फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी देखील सायबर सेल चोवीस तास लक्ष ठेऊन आहेत. यामुळे या रणनितीचा वापर करीत, सायबर युद्धाला जशास तसे तोंड देण्यासाठी राज्य पोलीस सज्ज झाले आहे.
अमोल राऊत








