विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ निपाणी येथे झालेल्या सभेत केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णादेवी यांच्या उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.
निपाणी मतदारसंघात दोनदा निवड करून जनसेवेची संधी दिली आहे. आता हॅट्रिक जिंकण्यासाठी सहकार्याची गरज आहे.
मतदारसंघात केलेल्या विकासकामेच श्रीरक्षा बनतील असा विश्वास आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी नांदेडचे मतदारसंघ प्रभारी अजित गोपछाडे , हालसिध्दनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोटीवाले, नगरपालिकेचे अध्यक्ष, सदस्य, महिला मोर्चा अध्यक्ष, सदस्य, पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि हजारो संख्येने महिला उपस्थित होत्या.












