► वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या इम्फाळ पूर्व आणि थौबल जिह्यातून सुरक्षा दलांनी बंदी घातलेल्या संघटनांच्या नऊ दहशतवाद्यांना अटक केली आहे. सदर दहशतवादी अपहरण आणि खंडणी प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून 32 पिस्तूल, 1 देशी बनावटीचे पिस्तूल, 5 हँडग्रेनेड, 4 आयईडी, इन्सास रायफलची जिवंत काडतुसे, 2 हँडसेट, 9 एमएम पिस्तूल आणि एक चिनी बनावटीचे ड्रोन जप्त करण्यात आले. त्यांची सध्या कसून चौकशी केली जात आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर करण्यात आलेली ही पहिलीच मोठी कारवाई आहे.









