लखनौ :
उत्तर प्रदेशमधील लखनौ-वाराणसी महामार्गावर सोमवारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात 9 जण ठार झाले. तसेच अन्य आठ जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारार्थ प्रयागराज येथे पाठवले आहे. अपघातसमयी टेम्पोमध्ये एकूण 17 जण प्रवास करत होते.
प्रतापगड येथे सोमवारी दुपारी 3.15 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. रायबरेलीहून वाराणसीकडे जाणारा एलपीजी टँकर विऊद्ध दिशेने येणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या टेम्पोला धडकल्यामुळे ही दुर्घटना घडली. अमेठीमध्ये गॅस रिकामा केल्यानंतर चालक गॅस टँकर घेऊन वाराणसीच्या दिशेने जात होता. लिलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहनगंज विक्रमपूर वळणावर समोरून दुचाकीस्वार व टेम्पोला पाहून टँकर चालकाने अचानक ब्र्रेक लावला. त्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.









