मंगळवारी दाखल अर्जात संदेश पारकर यांच्यासहित अपक्ष संदेश परकर यांच्या अर्जाचा समावेश
कणकवली / प्रतिनिधी
कणकवली विधानसभेसाठी एकूण आठ उमेदवारांनी नऊ अर्ज दाखल केले आहेत. मंगळवारी दाखल अर्जात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संदेश भास्कर पारकर तसेच अपक्ष संदेश सुदाम परकर, बंदेनवाज हुसेन खानी, प्रकाश नारकर, विश्वनाथ कदम व बहुजन समाज पार्टीचे चंद्रकांत जाधव यांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर सोमवारी दाखल अर्जात भाजपा महायुतीचे नितेश राणे यांचे दोन अर्ज व अपक्ष गणेश माने यांचे अर्ज दाखल झाले होते.









