गडकरी चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित सुरेश गडकरी चषक 12 वर्षाखालील आंतर कॅम्प क्रिकेट स्पर्धा आज खेळविण्यात आलेल्या सामन्यातील टिळकवाडी क्रिकेट अकादमीने बेळगाव स्पोर्टस क्लबचा, आनंद अकादमीने रार्जसचा तर निना अकादमीने टिळकवाडी अकादमीचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. प्रथमेश, अद्वैत चव्हाण, अफनान बाळेकुंद्री यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात बेळगाव स्पोर्टस क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात सर्व गडीबाद 123 धावा करीत त्यात आयुष आजगावकरने 20, तर सिध्दांतने 18 धावा केल्या. टिळकवाडी क्लबतर्फे यशने 3 गडीबाद केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना टिळकवाडी अकादमीने 22 षटकात 6 गडीबाद 124 धावा करून सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात अमोघ हिरेमठने 10 चौकारासह 58 धावा केल्या. बीएससीतर्फे पियुशने 1 गडीबाद केला.
दुसऱ्या सामन्यात रॉजर अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 16 षटकात सर्व गडीबाद 59 धावा केल्या. त्यात सुनील पाटीलने 16 धावा केल्या. आनंदतर्फे अद्वैत चव्हाणने 3, आरती कदम व अर्थव करडी यानी प्रत्येकी 2 गडीबाद केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 6.3 षटकात बिनबाद 62 धावा करून सामना 10 गड्यांनी जिंकला त्यात उमर पटवेगारने 4 चौकारासह 27, तर ओजस गडकरीने 4 चौकारासह 24 धावा केल्या. तिसऱ्या सामन्यात टिळकवाडी क्लबने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात सर्व गडीबाद 102 धावा केल्या. त्यात अमोघ हिरेमठने 3 चौकारासह 21, जीवा गौडरने 2 चौकारासह 16 धावा केल्या. निनातर्फे अफनान बाळेकुंद्री व विनीत पाटील यांनी प्रत्येकी 3 गडीबाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना निनाने 17 षटकात 3 गडीबाद 103 धावा करून सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात जियान सलीमवालेने 2 चौकारासह 27, समर्थने 13 धावा केल्या.









