अल्फा चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : एमसीसीसी क्रिकेट क्लब आयोजित अल्फा चषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात निना संघाने युनियन जिमखानाचा 2 गड्यांनी तर रॉजर्स संघाने जिमखानाचा 39 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. बिलाल एम. व इनायत यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पहिल्या सामन्यात युनियन जिमखान्याने 23 षटकात सर्व बाद 175 धावा केल्या. स्वयमने 60, रघुवीरने 30 तर लोहितने 23 धावा केल्या. निनातर्फे मदन, समर्थ व जिहान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना 19 षटकात 8 बाद 177 धावा करुन सामना 2 गड्यांनी जिंकला. बिलालने नाबाद 50, आकाशने 30 तर मदनने 28 धावा केल्या. जिमखानातर्फे पारस व लोहित यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात रॉजर्सने 19.2 षटकात सर्व बाद 165 धावा केल्या. इनायतने 85 धावा केल्या. जिमखानातर्फे पारसने 5 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखानाचा डाव 19.3 षटकात 127 धावात आटोपला. पारसने 32, अथर्वने 28 तर स्वयमने 19 धावा केल्या. रॉजर्सतर्फे रुजलने 3 तर अभिषेक व जिवन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
बुधवारचे सामने
रॉजर्स वि. निना स. 8 वाजता, एमसीसीसी वि. युनियन जिमखाना दु. 12.30 वाजता









