प्रतिनिधी/ सावंतवाडी-
दोन वर्षंमध्ये सावंतवाडी येथील निमिष देवेंद्र धुरी याने बँकॉक -थायलंड येथील आशियाई तंत्रज्ञान संस्थेची Msc. Aquacultur हि पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली. या क्षेत्रात (पी.एच.डी.) संशोधन करून शास्त्रज्ञ बनण्याचे त्याचे स्वप्न आहे. तसेच परदेशात जाऊन घेतलेल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग आपल्या देशामध्ये मlस्य प्रकल्प निर्मितीसाठी करून तरुणांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचे त्याचे ध्येय आहे.
बालपणापासूनच `पाण्यातील मासे’ हा कुतूहलाचा आणि जिव्हाळय़ाचा विषय असलेल्या निमिषचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे झाले. अगदी बालवाडीपासून त्याला एक आगळावेगळा छंद जडला होता. तो म्हणजे पाण्यातील माशांचे निरीक्षण. शाळेतील अभ्यासाबरोबरच हा छंदहि त्याने जोपासला.
डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त केले. त्यामुळे त्याला थायलंड- बँकॉक येथील आशियाई तंत्रज्ञान संस्थेकडून शिष्यवृत्ती मंजूर झाली. त्या आशियाई तंत्रज्ञान संस्थेमध्ये मत्सशास्त्रातील पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी त्याची निवड झाली. दोन वर्षामध्ये त्याने बँकॉक थायलंड येथील आशियाई तंत्रज्ञान संस्थेची Msc. Aquacultur हि पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली. निमिषचे वडील डॉ. देवेंद्र धुरी व्यवसायाने डॉक्टर असून आई प्रा. नीलम धुरी सावंतवाडी येथील श्री. पंचम खेमराज महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागप्रमुख आहेत. निमिषचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.