मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 23 ऑक्टोबरला कुडाळ येथे प्रवेश
मालवण/प्रतिनिधी
माजी खासदार निलेश राणे 23 ऑक्टोबरला शिवसेना शिंदे गटात दाखल होणार आहेत. ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटात कुडाळ येथे जाहीर कार्यक्रमात प्रवेश करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पक्षप्रवेशावेळी श्री. राणे यांना कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. शिंदे शिवसेना गटातील पक्षप्रवेशाबद्दल निलेश राणे 22 ऑक्टोंबर रोजी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.









