मुरलीधर पाटील यांच्या कोपरा सभांसह घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी
वार्ताहर /जांबोटी
खानापूर विधानसभा मतदारसंघातील म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना सर्वत्र वाढता पाठिंबा मिळत असून गुऊवारी त्यांच्या प्रचारार्थ जि. पं. माजी सदस्य जयराम देसाई यांच्या नेतृत्वाखाली मळव, दारोळी, निलावडे, मुगवडे, कोकणवाडा आदी गावात घरोघरी जाऊन प्रचारफेरी काढून कोपरा सभेचे आयोजन करून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी उमेदवार मुरलीधर पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मुगवडे येथे घेतलेल्या कोपरा सभेच्या अध्यक्षस्थानी पंच अनंत बेटगीरकर होते. प्रारंभी संदीप सुतार यांनी प्रास्ताविक करून स्वागत केले. यावेळी बोलताना युवा कार्यकर्ते प्रा. शंकर गावडा म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती संपविण्याचा घाट राष्ट्रीय पक्षाने घातला असून मराठी भाषा व संस्कृती वाचविण्याची जबाबदारी मराठी माणसांची आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता मराठी स्वाभिमान जागृत ठेवून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मुरलीधर पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, माजी सभापती माऊती परमेकर, गुणवंत भट, प्रा. कृष्णा पाटील यांची मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. या सभेला चंद्रकांत चिखलकर, चंद्रकांत नाईक, यशवंत नाईक यांच्यासह हणमंत जगताप रवींद्र शिंदे, राजू कुंभार, शंकर देसूरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मळव ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा
खानापूर विधानसभा मतदारसंघातील म. ए. समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना मळव ग्रामस्थांच्यावतीने एकमुखी पाठिंबा व्यक्त करण्यात आला. प्रगतशील शेतकरी निंगाप्पा पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोपरासभेत गेल्या 66 वर्षांपासून खितपत पडलेल्या सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी म. ए. समिती उमेदवाराला विजयी करण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला. यावेळी रमेश पार्सेकर, माजी जि. पं. सदस्य जयराम देसाई, माजी सभापती माऊती परमेकर, प्रा. शंकर गावडा यांची मार्गदर्शन करणारी भाषणे झाली. यावेळी दत्ता गावडे, परशुराम मुतगेकर, माऊती मुतगेकर, रवींद्र देसाई, रामू कदम, नागाप्पा कदम, दाजीबा पार्सेकर, महादेव पार्सेकर, मोहन देसूरकर, सहदेव भातखांडे, यशवंत कदम, राजाराम शास्त्री, शेटवाप्पा पार्सेकर, सोमाण्णा पार्सेकर चंद्रकांत काजुणेकर यांच्यासह ग्रामस्थ, समिती प्रेमीं कायकर्ते उपस्थित होते. या प्रचार फेरीत निलावडे, कोकणवाडा, दारोळी आदी गावात घरोघरी प्रचार करून समिती उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.









