वृत्तसंस्था /नागपूर
मध्यप्रदेशमधील इंदोर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरराज्य सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत रितिका ठाकेर, रोहन गुरबानी, सिमरन सिंघी आणि निकिता जोसेफ यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्राने पुरुष आणि महिला एकेरीचे अजिंक्यपद पटकावले. 19 वर्षाखालील वयोगटाच्या मुले आणि मुलींच्या आंतरराज्य विभागीय या स्पर्धेत पाच बॅडमिंटनपटूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या निकिता जोसेफने दोन पदके मिळवली. रितिका, सिमरन आणि रोहन यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुषांच्या विभागातील सुवर्णपदके पटकावली. मुलींच्या वरिष्ठ गटात निकिताने सुवर्णपदक मिळवले. महाराष्ट्राने मुलींच्या आणि महिलांच्या विभागातील जेतेपद राखले. रितीका आणि सिमरन या जोडीने दुहेरीत गुजरातच्या बालोनी आणि अंजली रावत यांचा 21-16, 21-18 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.









