ओटवणे प्रतिनिधी
माजगाव नाला सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निखिल सूर्यवंशी, उपाध्यक्षपदी दिनेश सावंत, सचिव पदी मंगेश राठवड तर खजिनदारपदी एलियास राजगुरू यांची निवड करण्यात आली.यावेळी कार्यक्रम नियोजक म्हणुन रुपेश नाटेकर, मंडप व्यवस्थापक सचिन कासार व रोशन तळवडेकर तर सदस्य म्हणून संजय माजगावकर, राजू कुबल, राजेश हरमलकर, आत्माराम कुबल, सुनिल सांगवेकर, वैभव मोर्ये, गौरव मुननकर, संजय बोंद्रे, बंटी कासार यांची निवड करण्यात आली.
यानिमित्त यानिमित्त सोमवारी १५, १६, १७ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम, त्यानंतर बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी कालेली येथील ओमकार नटेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे नाटक, गुरुवारी १९ ऑक्टोबर रोजी चिपळूण येथील जादूगार उदय कुमार यांचा कार्यक्रम, शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी म्हापण येथील पपेट शो, शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी स्थानिक मुलांचे कार्यक्रम, त्यानंतर कुडाळ येथील महिलांची फुगडी, रविवारी २२ ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथील विश्व कलामंचचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम, सोमवारी २३ ऑक्टोंबर रोजी श्रीयंत शिरसाट आणि रिया मेस्त्री यांच्यात डबलबारी यांच्यात होणार आहे.









