जोशी यांना 25 वर्षांचा अनुभव : अमेरिकन एरोस्पेसच्या कंपनीकडून नियुक्ती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
निखिल जोशी बोईंग डिफेन्स इंडियाचे एमडी बनले आहेत. ते कंपनीच्या वर्तमान आणि भविष्यातील कार्यक्रमांचे नेतृत्व करणार असून जोशी यांना 25 वर्षांचा कामाचा अनुभव आहे. अमेरिकन एरोस्पेस कंपनी बोईंगने गुरुवारी निखिल जोशी यांची बोईंग डिफेन्स इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केली. कंपनीने म्हटले आहे की ऑपरेशन मजबूत करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
जोशी हे भारताच्या संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणासाठी बोइंगच्या वर्तमान आणि भविष्यातील कार्यक्रमांचे नेतृत्व करतील. बोईंगमध्ये सामील होण्यापूर्वी जोशी यांनी ईटन एरोस्पेससाठी कंट्री मॅनेजर म्हणून काम केले. जोशी यांना संरक्षण उद्योगाचा 25 वर्षांचा अनुभव आहे.
जोशी भारतातील बोईंगच्या वाढीचे धोरण पुढे नेणार
बोइंग ग्लोबल सर्व्हिसेसचे एशिया पॅसिफिकचे उपाध्यक्ष स्कॉट कार्पेन्डेल म्हणाले: ‘आम्हाला आमच्या टीममध्ये निखिलचे स्वागत करताना आनंद होत आहे. त्यांचा अनुभव आणि कणखर नेतृत्व भारतातील आमची विकासाची रणनीती चालवेल.
जोशी बोईंग इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष सलील गुप्ते यांना अहवाल देतील, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. ते बोईंग डिफेन्स, स्पेस अँड सिक्युरिटी (बीडीएस) आणि बोईंग ग्लोबल सर्व्हिसेस (बीजीएस) सोबतही काम करतील.
जोशी यांची अन्य कामगिरी :
-भारतीय नौदलाच्या एव्हिएशन शाखेत दोन दशकांहून अधिक काळ सेवा
-जोशी यांनी फ्रंटलाइन शिप आणि एअर स्क्वॉड्रन या दोन्हींचे नेतृत्व केले
-जोशी यांनी ईटन एरोस्पेससाठी कंट्री मॅनेजर म्हणून काम केले आहे
-बोइंग भारतात 8 वर्षांपासून कार्यरत आहे