वार्ताहर /नंदगड
नंदगड येथे सोमवारी काँग्रेस उमेदवार अंजली निंबाळकर यांची प्रचारसभा झाली. या सभेत माजी मंत्री व हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे उपस्थित होते. यावेळी निधर्मी जनता दलाच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये प्रामुख्याने निधर्मी जनता दलाचे माजी तालुका अध्यक्ष एम. एम. सावकार, लायकअली बिच्चूनावर, एम. ए. इनामदार, मन्सूर ताशिलदार, ए. एम. जंगुभाई, इलियास पटेल, एस. एस. घाळीमठ, सजोखाना फटाण, गीता गौडर, राजाराम पाटील, एम. एम. राजेभाई आदींसह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.









