भाविकांचा उदंड प्रतिसाद
वार्ताहर /बांदा
निगुडे येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्र उत्सवा निमित्त भरगच्च सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून १५ ऑक्टोंबर रोजी घटस्थापने पासून या कार्यक्रमना सुरवात झाली आहे.पहिल्या दिवशी महिला फुगडी कार्यक्रमात उगवे- गोवा येथील महिलानी फुगडी सादर केली , त्या नंतर हरिपाठ इन्सुली, पुरस्कृत प्रकाश देसाई, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०७:०० वा. श्री देवी माऊली प्रसादिक भजन मंडळ,मडुरा यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. नंतर रात्री ८:०० वाजता तळकर महिला दांडिया गृप, तळवडे पुरस्कृत श्री देवी माऊली नवरात्र उत्सव समिती चा दांडीया सादर, रात्री ०९:०० वाजता स्थानिकांची भजने, दिनांक १७ ऑक्टोंबर रात्री ८:०० वाजता निगुडे गावठाणवाडी महिला मंडळाची फुगडी, रात्री ९:०० वाजता डॉ. टि.के.गावडे पुरस्कृत श्री देवी माउली दशावतार नाट्य मंडळ, इन्सुली यांचा नाट्यप्रयोग सादर झाला
आज. बुधवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी श्री देवी सातेरी महिला फुगडी अणसुर, ता.वेंगुर्ला पुरस्कृत गावडे परिवार यांचा फुगडी कार्यक्रम, रात्री ९:०० वाजता ग्लोविंग स्टार दांडिया ग्रुप आरोंदा यांचा दांडीया कार्यक्रम पुरस्कृत निगुडे तेलवाडी मित्र मंडळ निगुडे, दिनांक १९ ऑक्टोबर रोजी रात्रौ श्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ निगुडे यांचा नाट्य प्रयोग पुरस्कृत निगुडे- राणेवाडी दूरेवाडी ग्रामस्थ, दिनांक २० ऑक्टोबर सायंकाळी ७:०० वाजता महिलांची महाआरती रात्री ८:०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम . शनिवार दिनांक २१ ऑक्टोंबर रोजी रात्री ८:०० वाजता बुवा अमित तांबोळकर यांचा भजनाचा कार्यक्रम पुरस्कृत लक्ष्मण गंगाराम निगुडकर, सरपंच निगुडे , दिनांक २२ ऑक्टोबर









