Night Skin Care Routine : कोणत्याही कार्यक्रमाला अथवा पार्टीला जाताना तुम्ही मेकअप करता किंवा आॅफिसवर्क करताना लाईट मेकअप करता. दिवसा जशी चेहऱ्याची काळजी घेता तशीच काळजी रात्री घेणे गरजेची आहे. रात्री झोपताना त्वचेचं उत्तम काम सुरु असतं. रात्री निवांतपणा मिळाल्यानंतर सकाळी चेहरा सुंदर दिसतो. यासाठी काही बेसिक टिप्स वापरल्याने तुमचा चेहरा निखळण्यासाठी मदत होते. यासाठी क्लिंजिंग,टोनर,माॅश्चरायझिंग आणि रेटीनाॅल व नियमित वापरा. यामुळे तुमचे पार्लरचे पैसे नक्की वाचतील. चला तर जाणून घेऊया बेसिक स्टेप.
क्लिंजिंग: दिवसभर चेहऱ्यावर धूळ असते ती क्लीन करण्यासाठी तुम्ही संध्याकाळी क्लिंजगचा वापर करा. फेशवाॅश वापरण्यापूर्वी क्लिंझींग करून घ्या.
फेशवाॅश: क्लिझिंग झाल्यानंतर फेशवाॅशने चेहरा क्लिन करून घ्या. तुमच्या चेहरा कोरडा आहे कि तेलकट हे पाहून तुम्ही फेशवाॅशची निवड करा.
टोनर/ रोझ वाॅटर : चेहरा वाॅश झाल्य़ानंतर तुम्ही टोनरचा वापर करा. किंवा गुलाबपाणी देखील वापरू शकता. पण हे वापरत असताना तुम्ही चेहरा ओला असताना वापरा. चेहरा धुतल्यानंतर ६० सेकंदाच्या आत याचा वापर करा.
माॅश्चरायझिंग: गुलाबपाणी किंवा टोनर वापरून झाल्यानंतर तुम्ही चेहऱ्याला चांगले माॅश्चरायझिंग लावा.
रेटीनाॅल वापरा : चेहऱ्याला माॅश्चरायझिंग लावल्यानंतर रेटीनाॅलचा वापर करा.
डेली रूटिंगमध्ये याचा वापर केल्यास तुम्हाला निश्चितच चेहऱ्यावर फरक जाणवेल. चेहऱ्या सोबत कान आणि मानेला देखील याचा वापर करा. तुम्हाला हे सगळं करण शक्य़ नसेल तर बदामाच्या तेलाने चांगले माॅलिश करा. तुमचा चेहरा छान दिसेल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









