संशयिताकडून पेन ड्राईव्ह, मोबाईल फोन, सीमकार्ड जप्त
फोंडा : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशविरोधी कारवाईत संशयित म्हणून तिस्क-उसगांव, फोंडा येथीला एका अल्पवयीनाच्या चौकशीसाठी काल गुऊवारी पहाटे 3 वा. सुमारास त्याच्या घरावर छापा टाकला. फोंडा पोलिसांच्या टीमच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. झारखंड येथील एका देशविरोधी प्रकरणातील कारवाईत त्या संशयिताचा सोशल मीडियावरील अकाऊंट झळकल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयित वापरत असलेला मोबाईल फोन, सिमकार्ड, व पेनड्राईव्ह जप्त करण्यात आला असून अल्पवयीनाला आपल्या पालकांसह 25 सप्टेंबर रोजी झारखंड येथील रांची येथे एनआयएच्या कार्यालयात हजर राहण्याचा आदेश जारी केला आहे. संशयिताचे इन्स्टाग्राम व टेलेग्राम अकाऊंट गोठविण्यात आले असून त्याची पडताळणी एनआयएच्या टिमतर्फे करण्यात येणार आहे. अल्पवयीन हा 15 वर्षांचा असून फेंड्यातील एका माध्यमिक विद्यालयातील दहवीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी आहे.









