राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयएने कोल्हापुरात छापा टाकला आहे. यात इचलकरंजीतील एकाला तर कोल्हापुरातून एकाला असे दोघांना ताब्यात घेतले आहे. पीएफआयचा पदाधिकारी अब्दुल मुल्ला असं ताब्यात घेतल्याचे नाव आहे. जवाहर नगर मधील सिरत मोहल्ला येथून त्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर एकाचे नाव अद्याप समजले नाही. टेररिस्ट फंडिंग संघटनाशी लागेबंधे असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
काही दिवसापूर्वी आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून हुपरी येथे छापा टाकत दोन तरूणांना ताब्यात घेतले होते. आज पुन्हा कोल्हापुरात छापा टाकल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. खबरदारी म्हणून कमालीची गुप्तता पाळण्यात आलीयं. एनआयएने महाराष्ट्रात २० ठिकाणी छापेमारी केली आहे. यात आतापर्यंत पीएफआयशी संबंधित २० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पहाटे कारवाई करत एटीएसने महाराष्ट्रात औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले. मुंबई, नाशिक औरंगाबाद आणि नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब) आणि यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात वैर वाढवणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित २० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









