दहशतवादी फंडिंगप्रकरणी शोधमोहीम सुरूच
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) शुक्रवारी सकाळी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे पुन्हा छापे टाकले. तपास यंत्रणेची ही कारवाई दहशतवाद्यांचे अ•s उद्ध्वस्त करण्यासाठी करण्यात आली आहे. दहशतवादाशी संबंधित प्रकरणाच्या संदर्भात तपास यंत्रणेने पुलवामामध्ये दोन ठिकाणी शोधमोहीम राबविल्या. दोन दिवसांपूर्वी एनआयएने एनजीओच्या माध्यमातून काश्मीरमध्ये टेरर फंडिंग प्रकरणी 11 ठिकाणी छापे टाकले होते.
एनआयए पथकाकडून दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील दरगुंड आणि उगरगुंड या दोन ठिकाणी दिवसभर शोधमोहीम सुरू होती. एनआयए अधिकाऱ्यांनी पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल कर्मचाऱ्यांसह पहाटे याठिकाणी दहशतवाद्यांच्या अ•dयांवर छापे टाकले. पुलवामा आणि कुलगाम जिल्ह्यात पाच ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. एनआयएने कुलगाममधील शुच गावात हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी उमर गनई याच्या घराची झडती घेतली आहे. सुमारे वर्षभरापूर्वी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत उमर गनई मारला गेला होता. त्याचे वडील आणि भावाचीही चौकशी करण्यात आली. मात्र याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. एनआयएने पुलवामामध्येही दोन ठिकाणी छापे टाकले आहेत. तसेच दक्षिण काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांच्या दोन ओव्हरग्राउंड कार्यकर्त्यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.









