युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नाणोसकर यांच्या गाडीसमोर आला गवारेडा
न्हावेली / वार्ताहर
Nhaveli Sawantwadi main road all day Gawareda!
भर दिवसा दुपारी एक वाजता न्हावेली सावंतवाडी मुख्य रस्त्यावर माळकर टेंब येथील वळणावर दिसून आला. उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नाणोस ग्रामपंचायतीचे सदस्य सागर नाणोसकर यांच्या गाडीसमोर बुधवारी दुपारी 1 च्या दरम्यान अचानक गवारेडा रस्त्यावर आला.सागर नाणोसकर यांनी आपल्या गाडीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने अपघात टळला.मात्र दिवसाढवळ्या रस्त्यावर येणाऱ्या गवारेडा यांचा वनविभागाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









