न्हावेली / वार्ताहर
न्हावेली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार ‘ एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे ,पक्षाची विचारधारा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यत पोहोचवणे व कार्यकर्त्यांच्या संवादातून परिसराच्या विकासासाठी नावीन्यपूर्ण कल्पनांचा शोध घेणे असे उपक्रम एक तास राष्ट्रवादीसाठी या कार्यक्रमातून राबविले जातात. अशी माहिती कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी दिली .
या कार्यक्रमाला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ उपाध्यक्ष अजित नातू, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, महिला निरीक्षक दर्शना बाबर देसाई, दिपक करमळकर,भरत धाऊसकर, राजेश धाऊसकर, सागर धाऊसकर, सुनिल धाऊसकर, सदानंद न्हावेलकर,प्रथमेश निगुडकर,मितेश नाईक,देवानंद धाऊसकर, रामचंद्र धाऊसकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते .