न्हावेली / वार्ताहर
न्हावेली गावचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह नुकताच शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला.आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वातून व संजू परब यांच्या पुढाकारातून प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रवेश झाला.गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळावा यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे व्यक्त केले.दरम्यान त्यांनी प्रवेश केल्यामुळे आता त्यांचा शिवसेनेत योग्य तो सन्मान केला जाईल,असा विश्वास आमदार नीलेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.श्री.पार्सेकर हे ग्रामपंचायत निवडणूकीत निवडून आले होते.आमदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा प्रवेश केला.यावेळी राज धवण,नवनाथ पार्सेकर,प्रथमेश नाईक,विठ्ठल परब,राकेश न्हावेलकर,अमोल पार्सेकर,अनिकेत धवण,पुनीत नाईक,तुकाराम पार्सेकर,धनेश नाईक,ओकांर न्हावेलकर,दत्तप्रसाद पार्सेकर,चेतन पार्सेकर आदी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









