न्हावेली / वार्ताहर
न्हावेली-भोमवाडी येथील स्ट्रीटलाईट गेले पंधरा दिवस बंदावस्थेत असून याचा नाहक त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत तसेच वीज वितरण यांना सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असून आम्ही नेमकी कोणाकडे दाद मागावी असा ग्रामस्थ सालू फर्नांडिस यांनी केला आहे.
रस्त्यावर काळोख असल्याने दोन दिवसांपूर्वी एक अपघात घडला होता. तसेच ग्रामस्थांना रात्री अपरात्री घराबाहेर पडताना अंधारामुळे चाचपडत वाट शोधावी लागते. याची कल्पना ग्रामपंचायत प्रशासनास दिली असता वीज वितरण यांना सांगा असे सांगितले जाते तर वीज वितरणचे कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे येथील जनतेला उजेडात कोण आणणार असा सवाल सालू फर्नांडिस यांनी केला आहे. तसेच लवकरात लवकर स्ट्रीटलाईट सुरू करण्याची मागणी श्री. फर्नांडिस यांनी केली आहे.









