सर्व लोकसेवातर्फे विक्रेत्यांचा सत्कार
बेळगाव : वृत्तपत्र विक्रेत्यांना कामगारांचा दर्जा देऊन सरकारने त्यांना सर्व सोयी-सुविधा द्याव्यात, अशी मागणी सर्व लोकसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष वीरेश हिरेमठ यांनी केली आहे. बुधवारी काकती येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करून ते बोलत होते. वृत्तपत्र विक्रेते सुभाष पाटील यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. लक्ष्मण शिरूर, आनंद भातकांडे उपस्थित होते. ऊन, वारा, पाऊस, थंडीमध्ये ते नागरिकांना वेळेत वृत्तपत्रे पोहोचवतात. आम्ही झोपेत असतो, त्यावेळी ते घरोघरी फिरून वृत्तपत्रे वितरित करतात. अडचणींच्या वेळी सरकार किंवा संस्था त्यांच्या मदतीला धावत नाहीत. त्यामुळेच त्यांना कामगारांचा दर्जा देऊन सरकारने सोयी-सुविधा पुरवण्याची मागणी वीरेश यांनी केली.









