ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकिय गदारोळ चालू आहे. देशात आणि देशाबाहेर सुद्धा यावर प्रतिक्रिया उमटत असून या प्रकरणात आता चीनने सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारतातील सध्याच्या धार्मिक आणि राजकिय घोंगावणऱ्या वादळवर प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी आपले मत मांडले. “भारतात घडलेली घटना योग्यरित्या हाताळली जाईल अशी आशा आहे.” अशी टिप्पणी करताना चीनच्या मंत्रालयाने केली.
सोमवारी पत्रकार परिषदेत एका टिव्ही चॅनले चिनच्या परराष्ट्र मंत्रालयाला नुपूर शर्मा प्रकरणावर आपले मत विचारले. “भारताच्या भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबर यांच्यावरिल वक्तव्यामुळे भारत आणि इस्लामिक देशांमध्ये असंतोष पसरला आहे” यावर मत विचालरले असता मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हे प्रकरण योग्यरित्या हाताळले जाईल अशी प्रतिक्रिया दिली.