Newly elected MLA Dyaneshwar Mhatre was welcomed by Dodamarg Mayor Chetan Chavan
कोंकण पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे कसई – दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देत आपल्या सहकाऱ्यांसह मोपा विमानतळ येथे जंगी स्वागत केले. यावेळी आमदार म्हात्रे यांचे बंधू वामन म्हात्रे हेही उपस्थित होते.
नुकतीचा कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असून ह्यात आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ही विजयी झाले आहेत. विजयी झाल्यानंतर प्रथमच ते सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले असता त्यांचे दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी हे स्वागत केले. यावेळी पं. स. माजी उपसभापती लक्ष्मण नाईक, दोडामार्ग भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रवीण गवस, रंगनाथ गवस, यांसह गणेश राणे, सुनील गवस आदी उपस्थित होते.
दोडामार्ग / प्रतिनिधी









