ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
फिनलंडचे अध्यक्षांनी रविवारी जाहीर केले की फिनलंड देश नाटोच्या सदस्यत्वासाठी ईच्छूक असून, युक्रेनमधील रशियाच्या युद्धादरम्यान 30 सदस्यीय लष्करी युतीचा विस्तार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्राध्यक्ष साऊली निनिस्टो आणि पंतप्रधान सना मारिन यांनी हेलसिंकी येथील राष्ट्रपती राजवाड्यात संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. फिनलंडच्या संसदेने येत्या काही दिवसांत या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे अपेक्षित आहे, परंतु ही केवळ औपचारिकता मानली जाते. पुढच्या आठवड्यातऔपचारिक सदस्यत्व अर्ज ब्रुसेल्समधील नाटो मुख्यालयात सादर केला जाईल.