मुंबई प्रतिनिधी
दिल्लीच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या माजी व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चित्रा रामकृष्ण आणि माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि चित्रा रामकृष्ण यांचे सल्लागार आनंद सुब्रमण्यम या दोघांचा जामीन अर्ज फेटाळला.
विशेष सीबीआय न्यायाधीश संजीव अग्रवाल यांनी याप्रकरणी चित्रा रामकृष्ण आणि अरविंद सुब्रमण्यम यांना जामीन देण्यास नकार दिला. चित्रा रामकृष्ण यांची ही पहिली जामीन याचिका असून अरविंद सुब्रमण्यम यांची ट्रायल कोर्टातील दुसरी जामीन याचिका होती.
न्यायालयाने अलीकडेच यासंदर्भातील आदेश राखून ठेवला होता आणि म्हटले होते की, आरोपी चित्रा रामकृष्णा यांनी दाखल केलेल्या अर्जावर कलम 439 फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) नुसार युक्तिवाद ऐकण्यात येऊन निकाल देण्य़ात आला. तसेच कलम 437/439 CrPC अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अरविंद सुब्रमण्यम यांच्या दुसऱ्या जामीन अर्जावर पुढील युक्तिवादही लांबणीवर ऐकण्यात येऊन आरोपींच्या वतीने निकाल देण्यात आला.
सीबीआयने मार्चमध्ये चित्रा रामकृष्ण आणि आनंद सुब्रमण्यन यांना NSE सह-स्थान प्रकरणाच्या संदर्भात फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. पण जामीन मिळाल्यानंतर सीबीआयने रामकृष्णाच्या जामीन याचिकेला विरोध केला आणि आणि असे सांगितले की चित्रा अत्यंत प्रभावशाली असून कागदोपत्री किंवा डिजिटल पुराव्यांशी छेडछाड करू शकते तसेच जामिनावर सुटल्यास साक्षीदारांची हेराफेरी करण्याची शक्यता आहे. या कालावधीत चित्रा रामकृष्णा या NSE च्या उच्चपदस्थ अधिकारी (MD) होत्या. तसेच त्य़ांच्च्याविरुद्धचे पुरावे यापूर्वीच उघड झाले आहेत. जामीन मंजूर केल्याने तपासावर विपरीत परिणाम होईल असा युक्तीवाद सीबीआय ने केला आहे.
सीबीआयने आपल्या उत्तरात असेही म्हटले आहे की या प्रकरणाशी संबंधित कट आणि त्यात चित्रा रामकृष्ण यांची भूमिका उघड करण्यासाठी इतर साक्षीदारांची तपासणी सुरू आहे. त्या संपूर्ण सह-स्थान सेटअप पाहत असल्याने जामिनावर मुदतवाढ मिळाल्यास ती साक्षीदारांना वेठीस धरू शकते, अशी भीती सीबीआयने व्यक्त केली आहे.








