न्यूकॅसल (ब्रिटन)
न्यूकॅसल फुटबॉल संघाने इंग्लिश लिग चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद बऱ्याच वर्षानंतर पटकावले. या कामगिरीमुळे शनिवारी येथे न्यूकॅसल क्लबच्या संघाचे स्वागत करण्यासाठी सुमारे दीड लाख फुटबॉल शौकिनांनी गर्दी केली होती.
ब्रिटनमध्ये इंग्लिश प्रिमियर लिग चषक फुटबॉल स्पर्धा प्रतिष्ठेची समजली जाते. ईडी होवेच्या न्यूकॅसल फुटबॉल संघाचा या स्पर्धेच्या इतिहासातील गेल्या 70 वर्षांच्या कालावधीतील जेतेपदाचा दुष्काळ यावेळी संपुष्टात आला. शनिवारी या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात न्यूकॅसल संघाने लिव्हरपूलचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
न्यूकॅसलच्या या जेतेपदाचा जल्लोष करण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गावर शौकिनांनी प्रचंड गर्दी केल्याने पोलिसांना परिस्थिती हाताळणे कठीण गेले. न्यूकॅसल संघाने यापूर्वी म्हणजे 1955 साली एफए चषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर या संघाला जेतेपद आजपर्यंत मिळू शकले नव्हते. न्यूकॅसल फुटबॉल संघातील खेळाडूंची एका खुल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिलांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता.









