बेळगाव : दानशुऱांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीतून एका नवजात बालिकेवर वेळीच वैद्यकीय उपचार करणे शक्य झाले आहे. यामुळे या बालिकेच्या पालकांना दिलासा मिळाला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, येथील ऊक्मीणीनगरातील एक श्रमिक दांपत्य 12 वर्षांपासून अपत्याच्या प्रतीक्षेत होते. वैद्यकीय उपचारानंतर या दांपत्याला अपत्यप्राप्ती झाली. महिलेने व मुलीला जन्म दिला. मात्र, अवधीपूर्वी प्रसुती झाल्याने अर्भकाच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली. अर्भकावर उपचारासाठी 8 ते 10 लाख ऊपये खर्च येणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर जन्मदाते हतबल झाले. येथील समाजसेवक व क्रिज वाईज क्लॉथ स्टोअर्सचे मालक कृष्ण भट यांनी दांपत्याची भेट घेऊन मदतीचा हात पुढे केला.
गरीब दांपत्याला आणखी मदत मिळवून देण्यासाठी वॉट्सअपद्वारे मदतीचे आवाहन केले. जन्मदात्री सरिता खटावकर यांच्या बँक अकौन्टवर सुमारे लाख ऊपये जमा झाले. कृष्ण भट व पंकजा भट यांनी सरिता खटावकर यांना 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. दरम्यान, शिवापूरचे मुप्पीन काडसिद्देश्वर स्वामी यांनीही मठाला मिळालेल्या देणगीतील 25 हजार ऊपये व इतरांनी जमा केलेली रक्कम एकूण 2 लाख 36 हजार रुपये सरिता खटावकर यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी आपणाला झालेल्या अपघाताप्रसंगी जनतेकडून मदत मिळाल्याचे सांगून स्वामीनी जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विजयालक्ष्मी हिरेमठ, जयश्री मंड्रोळी, लीलाबाई रेळेकर उपस्थित होत्या.









