वृत्तसंस्था/ हॅमिल्टन
यजमान न्यूझीलंडने बांगलादेश विरुद्धची महिलांची 2 सामन्यांची वनडे मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली आहे. या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे पूर्ण वाया गेला. दरम्यान न्यूझीलंडने या मालिकेतील वेलिंग्टनचा पहिला सामना जिंकला होता.
या मालिकेतील दुसऱया सामन्यात न्यूझीलंडने 123 धावा जमविल्या होत्या. न्यूझीलंडच्या बेट्स आणि डिव्हाइन यांनी बऱयापैकी फलंदाजी केली. डिव्हाइनने 39 चेंडूत 4 चौकारांसह 42 तर बेट्सने 80 चेंडूत 51 धावा झमविल्या. यानंतर पावसाला प्रारंभ झाल्याने खेळ थांबविण्यात आला होता. पंचांनी पाऊस थांबत नसल्याचे पाहून हा सामना रद्द झाल्याची घोषणा केली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने बांगलादेशचा 8 गडय़ांनी पराभव केला होता. न्यूझीलंड महिला संघाने या वनडे मालिकेपूर्वी झालेली टी-20 मालिका ही एकतर्फी जिंकली होती.









