वृत्तसंस्था/ चेन्नई
आयसीसीची महिलांची विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धा भारतामध्ये 30 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाने भारतातील वातावरणाशी समरस होण्याकरता चेन्नईमध्ये आगमन केले आहे. न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाच्या सराव शिबिराला येथे प्रारंभ झाला आहे.
महिलांच्या टी-20 आणि वनडे विश्वचषक स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाने बाळगले आहे. न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाचे व्हाईट फर्न्स प्रमुख प्रशिक्षक असून, बेन स्वॉएर आणि क्रेग मॅकमिलन हे साहाय्यक प्रशिक्षक म्हणून लाभत आहेत. चेन्नई सुपरकिंग्ज अकादमीच्या प्रांगणांमध्ये न्यूझीलंड महिला क्रिकेट संघासाठी दोन आठवड्यांचे सराव शिबिर सुरू झाले आहे.
न्यूझीलंड महिला संघामध्ये क्रिकेट न्यूझीलंडशी मध्यवर्ती करार केलेल्या सात खेळाडूंचा समावेश असून, त्यामध्ये अष्टपैलू जेस केर, जॉर्जिया, प्लिमेर, अष्टपैलू ब्रुकी हॅलिडे, इझी शार्प, फ्लोरा देवॉनशिरे आणि इमा मॅक्लोड यांचा समावेश आहे. आगामी महिलांच्या टी-20 विश्व चषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंना भारतातील वातावरणाचा अनुभव मिळावा आणि या सराव शिबिराचा फायदा प्रमुख स्पर्धेवेळी न्यूझीलंड महिला संघाला होण्याच्या हेतूने हे सराव शिबिर भारतात घेण्याचा निर्णय क्रिकेट न्यूझीलंडने घेतला आहे.
न्यूझीलंड महिला संघाला या सराव शिबिराचा फायदा इंग्लंडविरुद्ध दुबईमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही मिळेल. तसेच दक्षिण आफ्रिका आणि भारतीय महिला क्रिकेट संघाबरोबर न्यूझीलंडचे सरावाचे सामने आयोजित केले आहेत. आयसीसीच्या आगामी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंडचा सलामीचा सामना बलाढ्या ऑस्टेलियाबरोबर 1 ऑक्टोबर इंदोरमध्ये होणार आहे.
…









