वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी क्रिकेट न्यूझीलंडने आपल्या संघासाठी नव्या जर्सीचे सोमवारी अनावरण केले. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याची घोषणा केली.

वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट व यष्टिरक्षक फलंदाज टॉम लॅथम यांनी नवी जर्सी घातल्याचे दिसून आले. न्यूझीलंडने अलीकडेच मायदेशात इंग्लंडविरुद्ध चार सामन्यांची वनडे मालिका खेळली आणि त्यात त्यांना 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. आता त्यांची बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका होणार असून त्याची सुरुवात गुरुवारी 21 सप्टेंबरपासून होईल. फर्ग्युसन या मालिकेत संघाचे नेतृत्व करणार असून संघात अनेक युवा खेळाडूंचा समावेश आहे. 11 सप्टेंबर रोजी न्यूझीलंडने वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा केली असून केन विल्यम्सनचे त्यात पुनरागमन झाले आहे. विल्यम्सन व टिम साऊदी हे चौथ्यांदा विश्वचषक स्पर्धेत खेळणार आहेत. विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडची सलामीची लढत इंग्लंडविरुद्ध पहिल्याच दिवशी 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे.









