वृत्तसंस्था/ ऑकलंड
येत्या बुधवारपासून सुरु होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली असून काईल जेमिसन आणि फिरकी गोलंदाज सोधी यांचे पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडच्या या संघामध्ये नाथन स्मिथ हा एकमेव नवा चेहरा आहे.
या मालिकेसाठी 14 जणांचा न्यूझीलंड संघ घोषित करण्यात आला. मिचेल सँटनरकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेनंतर सोधीचे न्यूझीलंड संघात पुनरागमन होत आहे. केन विल्यम्सनने टी-20 प्रकारातून नुकतीच निवृत्तीची घोषणा केल्याने त्याचा या मालिकेसाठी विचार करण्यात आला नाही. न्यूझीलंड टी-20 संघ – सँटनर (कर्णधार), ब्रेसवेल, चॅपमन, कॉन्वे, डफी, फोक्स, जेमिसन, मिचेल, नीशम, रचिन रवींद्र, रॉबिन्सन, सिफर्ट, नाथन स्मिथ आणि सोधी.









