नवारस्ता :
न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी मुंबईतील राजभवन येथे महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत उपस्थित राहून पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांचे स्वागत केले. याप्रसंगी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी लक्सन यांना एप्रिलमध्ये सातारा (महाबळेश्वर) येथे होणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाकरिता निमंत्रण दिले.
महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सातारा जिह्यातील महाबळेश्वर पाचगणी येथे एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय पर्यटन महोत्सत्व संपन्न होणार आहे. विविध देश आणि भारत यांच्यातील पर्यटन वाढीसाठी अधिक गती देण्यासाठी राज्य शासनाने इतर राज्यासहित विविध देशांना निमंत्रित करण्यात आले आहे. परिणामी या महोत्सवाला देश परदेशातील पर्यटन प्रेमी मोठ्या प्रमाणात भेटी देणार आहेत.
शंभूराज देसाई यांनी लक्सन यांना एप्रिलमध्ये सातारा (महाबळेश्वर) येथे होण्राया महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाकरिता निमंत्रण दिले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी विविध विषयांवर सुसंवाद झाला.
यावेळी महाराष्ट्रातील पर्यटन विकासासाठी राज्य शासन करत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती यावेळी पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांना दिली. राज्यातील गडकिल्ले आदी ऐतिहासिक, तसेच नैसर्गिक स्थळे आणि धार्मिक व आध्यात्मिक तीर्थस्थाने यांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. या समृद्ध वारशाचा अनुभव घेण्यासाठी न्यूझीलंडच्या पर्यटकांनी महाराष्ट्रात जरूर यावे. यादृष्टीने आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.
दरम्यान, यापूर्वी ही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाचे स्वित्झर्लंडचे महावाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) मार्टिन मायर, जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळ यांनाही मुंबई येथे सातारा जिह्यातील महाबळेश्वर पाचगणी येथे होणाऱ्या महाराष्ट्र पर्यटनाचे निमंत्रण दिले असतानाच आता न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनाही महाराष्ट्र पर्यटनाचे निमंत्रण दिले.








